चांदिवली पवई : टँकर माफिया समोर मनपा प्रशासनाने टेकले गुडघे, पुरावे असून देखील कारवाई नाही

ambika

चांदिवली पवई, मुंबई या ठिकाणी अंबिका वॉटर सप्लाय नावाचे टँकर दिवस रात्र पाणी चोरी करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. तक्रारदाराला मात्र सदर कनेक्शन अनधिकृत असून डिस्कनेक्ट करण्यात आले असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लेखी स्वरूपात सांगण्यात आले असता, प्रत्यक्षात तशी कोणती हि कारवाई झाली नसल्याने एल वॉर्ड मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हि पाणी चोरी साकी विहार रोड , एल अँड टी कंपनीच्या गेट नं. ७ समोर केली जात आहे. स्थानिक मनपा एल वॉर्ड कार्यालय तसेच वरिष्ठ मनपा अधिकारींकडे पाणी चोरी ची तक्रार झाल्यानंतर देखील अंबिका वॉटर सप्लाय यांच्या विरोधात प्रत्यक्ष कोणती हि कारवाई न झाल्याने तसेच तक्रारदाराला खोटे उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनसे पदाधिकारी डॉ. वेद तिवारी यांनी ह्या तक्रारी केली आहे.

एल वॉर्ड, कुर्ला या विभागांतर्गत मोठा क्षेत्र हा डोंगराळ भागात असून तेथील नागरिकांना वर्ष भर पाणी टंचाईच्या समस्ये समोर जावा लागतो. त्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांमधून अनधिकृत कनेक्शन मार्फत पाणी चोरी होत असल्याने या नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. स्थानिक लोक सेवकांनी हि या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तक्रारदार वेद तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २० नोव्हेम्बर रोजी मेल पाठवून त्यांनी केलेल्या तक्रारीचे उत्तर दिले आहे. या उत्तर मध्ये ‘पाणी चोरीची जागा तपासली असता त्या ठिकाणी अनधिकृत कनेक्शन सापडले, म्हणून ते डिस्कनेक्ट करण्यात आले’ असे लिहले आहे. मात्र त्याच ठिकाणी २१ नोव्हेम्बर रोजी सकाळी साढ़े अकरा वाजता अंबिका वॉटर सप्लाय टँकर हे पाणी चोरी करीत असल्याचे फोटो ई-भारत च्या हाती लागले आहे. त्यामुळे तक्रारदाराला खोटे उत्तर देऊन तसेच टँकर माफिया अंबिका वॉटर सप्लाय यांच्या विरोधात कोणती हि कारवाई न झाल्याने स्थानिक मनपा प्रशासन टँकर माफिया ला प्रत्यक्ष मदत करीत असल्याचे संशय व्यक्त केले जात आहे. दोन वर्षांपूर्वी ह्याच पाणीचोरी चा मुद्दा भाजप नेत्यांनी मनपा सभागृहात अत्यंत जोरदार पणे उचलला होता आणि या टँकर माफिया विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मांगणी केली होती. पण दोन वर्ष उलटून हि त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी झाली नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे.

तक्रारदार वेद तिवारी यांच्यानुसार स्थानिक मनपा अधिकारींच्या संगनमताशिवाय हि पाणी चोरी शक्य नाही. पुरावे देऊन सुद्धा एल वॉर्ड चे सहायक अभियंता जलकामे श्री राजन प्रभू यांनी टँकर माफिया विरोधात कोणती हि कारवाई केली नाही, त्यांना दंड थोपटले नाही किंवा त्यांच्या विरोधात पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला नाही. टँकर माफियांविरोधात कारवाई करण्यास अपयशी ठरल्यामुळे श्री राजन प्रभू यांना तातडीने निलंबित करण्याची मांगणी वरिष्ठ मनपा अधिकारींकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक समाजसेवक नंदकिशोर नलावडे यांच्यानुसार टँकर माफिया विरोधात कारवाई न करण्याचे मोठे कारण म्हणजे त्या पाणी चोरी मागे मनपा अधिकारी तसेच सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना मिळणारी मोठी आर्थिक मलाई आहे. स्थानिक लोकसेवकांनी जनतेच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून येणाऱ्या काळात जनता ह्या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार, असे मत नलावडे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *