एम. आर. मेडिकल स्टोअर्स वर एफडीए अधिकारी मेहरबान, गंभीर त्रुटी सापडून देखील कारवाईस टाळाटाळ

डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय, रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत शेड्युल एच १ औषधांची विक्री

m-r-medical
सांताक्रूझ पूर्व येथील एम. आर. मेडिकल स्टोर्स वर एफडीए अधिकारी मेहरबान असल्याचे चित्र आहे. समाज कल्याण परिषद या एन जी ओ ने एम. आर. मेडिकल स्टोअर्स हे डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय शेड्युल एच १ औषधे विकत असल्याची लेखी तक्रार वांद्रे येथील एफडीए कार्यालयात केली होती. पुराव्यांच्या स्वरूपात तक्रारीसोबत औषधांची बिले पण जोडण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी ०२ डिसेंबर रोजी एम. आर. मेडिकल स्टोर्स वर धाड टाकून तक्रारीत नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगे चौकशी करून एम. आर. मेडिकल स्टोअर्स विरोधात कारवाई करण्याबाबतचे चौकशी अहवाल सहायक आयुक्त के. टी. मोरे यांच्या कार्यालयात सादर केले होते. या अहवालामध्ये एम. आर. मेडिकल यांनी डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय, रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत शेड्युल एच १ औषधांची विक्री केल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

या पूर्वी देखील अशाच अनियमिततांमुळे वर्ष २०१३ आणि २०१७ मध्ये देखील एम. आर. मेडिकल स्टोर्स चे लायसेंस एक महिन्याच्या कालावधी करिता निलंबित करण्यात आले होते पण या निलंबन आदेशांविरोधात शासनाकडून स्टे ऑर्डर मिळवण्यास एम. आर. मेडिकल स्टोर्सला यश आले होते. ह्याचाच फायदा उचलून एम. आर. मेडिकल स्टोर्स ने डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय शेड्युल एच १ औषधांची विक्री सर्रास चालू ठेवली होती.

शेड्युल एच १ औषधांमध्ये झोपण्याच्या गोळ्या, हाय ग्रेड अँटिबायोटिक्स, पेन किलर्स व इतर अतिसंवेदनशील गोळ्यांचा समावेश होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनियमित प्रमाणात हि औषधे घेतल्याने किडनी फेल, नशेखोरी, औषध प्रतिरोध अशा अनेक गंभीर आजार शरीरामध्ये निर्माण होतात. या औषधांची डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय विक्री केल्याने सार्वजनिक आरोग्यला धोका निर्माण होण्याची शक्यता एफडीए ने वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र असे असून हि एफडीए झोन ५ चे सहायक आयुक्त के. टी. मोरे यांनी एम. आर. मेडिकल चे लायसेंस रद्द करण्याचे आदेश न देता सलग तिसरी वेळ त्यांचे लायसेंस निलंबित करण्याचे आदेश काढले आहे. एम. आर. मेडिकल स्टोर्स चे मालकाने एफडीए अधिकारींवर राजकीय दबाव टाकल्याची हि चर्चा आहे. एवढेच नव्हे तर लायसेंस रद्द ना करण्याकरिता एफडीए च्या एका मोठ्या अधिकारीने आर्थिक व्यवहार हि केल्याचे सांगण्यात येत आहे. एफडीए चा हा मोठा अधिकारी या निलंबन आदेशाविरोधात शासनाकडून ‘स्टे’ मिळवून देण्यास सक्रिय असल्याची माहिती हि एफडीए सूत्रांकडून मिळाली आहे. या गोष्टीं मुळे एफडीए च्या कार्यपद्धती वर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित झाले आहे.

तक्रारदार व एन जी ओ चे अध्यक्ष डॉ. वेद तिवारी यांनी हि कारवाई समाधानी नसल्याचे सांगितले आहे. ‘एम. आर. मेडिकल स्टोर्स हे पुन्हा पुन्हा तीच चूक करून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. पूर्वी दोन वेळा लायसेंस निलंबनाची पार्श्वभूमी असताना तसेच चौकशी अहवाल मध्ये नमूद करण्यात आलेल्या गंभीर त्रुटी लक्षात घेता सहायक आयुक्त श्री. के. टी. मोरे यांनी एम. आर. मेडिकल स्टोर्स चे लायसेंस रद्द करणे अपेक्षित होते. निलंबनाच्या कारवाई मुळे एफडीए च्या कथनी व करनी मध्ये मोठा फरक असल्याचे सिद्ध झाले आहे. डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय, रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत शेड्युल एच १ औषधांची विक्री हि गंभीर बाब असून मात्र एफडीए या बाबतीत गंभीर नसल्याचे हि स्पष्ट झाले आहे. एफडीए अधिकारी हे शासनाकडून देण्यात आलेले discretionary power चे गैरवापर तसेच स्वतःच्या सोयीनुसार वापर करीत असल्याचे डॉ. वेद तिवारी यांनी सांगितले. त्यांनी याबाबतीत सहायक आयुक्त के. टी. मोरे यांच्या विरोधात कारवाई करण्याची आणि सार्वजनिक आरोग्यच्या हितामध्ये एम. आर. मेडिकल स्टोर्स चे लायसेंस रद्द करण्याबाबतची विनंती शासनाकडे करीत असल्याचे हि सांगितले.

One thought to “एम. आर. मेडिकल स्टोअर्स वर एफडीए अधिकारी मेहरबान, गंभीर त्रुटी सापडून देखील कारवाईस टाळाटाळ”

  1. याबाबत सखोल चौकशी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी जातीने करून या प्रकरणी तातडीने सदर मेडिकल दुकानाचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश तातडीने द्यावेत जेणे करून अशा प्रकारची मनमानी करणाऱ्या औषध व्यावसायिकांना धडा मिळू शकेल !
    सूर्यकांत गंगाराम चव्हाण
    माजी नगरसेवक-सांताक्रूझ (पूर्व)
    मोबाईल -९७०२०५१७७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *